Friday, January 23, 2026
HomeनगरAhmednagar Accident News : पांढरी पुलावर अपघाताची मालिका सुरूच.. कंटेनरला धडकून दुचाकीस्वार...

Ahmednagar Accident News : पांढरी पुलावर अपघाताची मालिका सुरूच.. कंटेनरला धडकून दुचाकीस्वार ठार

गणेशवाडी | वार्ताहर

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पुलावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहे. कालच रात्री तीन अपघात होऊन काही जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच उभ्या कंटेनरला धडकल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पांढरी पुल येथील एका हाॅटेल जवळ उभे असलेल्या कंटेनरवर (एमएच ४० वाय ८८५९) वरती बेलपिंपळगाव येथील सुभाष आसाराम गारुळे व आणखी एक जण दुचाकीवरून (एमएच १७ एएल ३८१७) नगरच्या दिशेने निघाले होते. त्याचदरम्यान ते पांढरी पुल येथे उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकून जागीच मृत झाले. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

YouTube video player

दरम्यान पांढरी पुल येथे असलेल्या भेळीच्या दुकानासमोरच ग्राहक आपले वाहन ऊभे करत असतात. घाटातील वाहनांचा वेग जास्त असल्याने देखील अनेक वेळा अपघात झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे अतिक्रमण देखील हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

अत्याचार

त्या नराधमाला पाहताच चिमुकली घाबरुन पालकांच्या मागे लपली; बदलापूरात पुन्हा चिमुकलीवर...

0
बदलापूर | Badlapurबदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य...