Monday, June 24, 2024
Homeनगरमतमोजणी परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित

मतमोजणी परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित

एसपींचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची (Ahmednagar And Shirdi Loksabha) मतमोजणी एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होणार असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता मतमोजणी परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ (वाहन विरहीत क्षेत्र) (No Vehicle Zone) घोषित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी काढले आहेत. नागापुर एमआयडीसी येथे येण्या-जाण्याच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

साईरत्न हॉटेल चौक-एल अ‍ॅण्ड टी कॉलनी-पारस कंपनी पर्यंत जाणारा रस्ता तसेच वखार महामंडळ लगतच्या चारही बाजुचे रस्ते ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सुमारे 600 पोलीस अधिकारी व अंमलदारांना बंदोबस्त तैनात केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या