Thursday, May 23, 2024
Homeनगरवडाळा बहिरोबा येथे कंटेनर डंपरवर धडकला

वडाळा बहिरोबा येथे कंटेनर डंपरवर धडकला

वडाळा बहिरोबा |वार्ताहर|Vadala Bahiroba

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) वडाळाबहिरोबा (Vadala Bahiroba) येथे नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील (Ahmednagar-Aurangabad Highway) दुभाजकानजिक उभ्या असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) डंपरला पाठीमागून कंटेनर धडकल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुभाजकावरील गवत काढण्याचे काम करणार्‍या दोघा मजुरांसह कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. अन्य तीन जण जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

अपघातात रमेश भगवान माने (वय 50-रा. बाभुळखेडा ता. नेवासा), ऋषिकेश संजय निकम (वय 25-रा. सलाबतपूर ता. नेवासा) व सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कंटेनर चालक दादा राजाराम खराडे (वय 30) यांचा मृत्यू झाला. तर मेहबुब इब्राहिम शेख, संभाजी आसाराम वायकर व बाळासाहेब रघुनाथ पटेकर हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावर रस्ता दुभाजकावर उगवलेले गवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मजुरांद्वारे काढून घेतले जात होते. काढलेले हे गवत भरुन नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा डम्पर दुभाजकानजिक नगरच्या दिशेने उभा केेलेला होता. ज्ञानेश रोलिंग वर्क्स समोर उभ्या असलेल्या या डम्परवर औरंगाबादहून नगरच्या दिशेने जात असलेला भरधाव कंटेनर मागच्या बाजूने धडकला. दुभाजकावर गवत काढण्याचे काम करत असलेले दोघे मजूर जागीच ठार झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या