Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहमदनगर । प्रतिनिधी

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत पाण्याची आवक जरी सुरू असली तरी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी सध्या पेरणी झालेल्या पिकांची स्थिती नाजूक असून पावसाने दडी मारल्याने चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात 13 लाख 78 हजार गायी आणि 2 लाख 21 हजार असे एकूण 15 लाख 99 हजार गायी वर्गीय जनावरांची संख्या असून त्यांना महिनाअखेर म्हणजे 31 जुलैपर्यंत पुरेल ऐवढा चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय वाढला असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुध धंद्याकडे पाहिले जात आहे. यामुळे मोठ्या संख्याने पशूधनात वाढ झालेली आहे. पाऊस लांबल्याने विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाथर्डी, कर्जत, जामखेडसह अन्य काही तालुक्यात चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात मार्च 2023 अखेर पशूधनासाठी 76 लाख 11 हजार 990 मेट्रीक टन चारा उपलब्ध होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या