Saturday, November 23, 2024
Homeनगर'महाआघाडी' अहंकाराचा महामेरु; आशिष शेलार यांची सरकारवर टीका

‘महाआघाडी’ अहंकाराचा महामेरु; आशिष शेलार यांची सरकारवर टीका

अहमदनगर | Ahmednagar

राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने प्रत्येक मंत्री आपआपल्या पद्धतीने निर्णय घेत आहेत. मंत्री केवळ कार्यकर्ते पोसण्याचे काम करत असून, करोनाच्या आडून मोठे राजकारण सुरू आहे. प्राथमिक, माध्यमिक, तांत्रिक शिक्षणाबाबत कोणतेच ठोस धोरण नसल्याने गेल्या दोन वर्षापासून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. सत्तेतील प्रत्येकजण केवळ स्वार्थ पाहत आहे. हे सरकार म्हणजे अहंकाराचा महामेरू असल्याची जळजळीत टीका भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी केली.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

नगरमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आ. शेलार बोलत होते. शहरात आल्यानंतर भाजपतर्फे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी संपर्क कार्यालयात त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, संतोष गांधी, सचिन पारखी, चेतन जग्गी, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, भिंगार अध्यक्ष वसंत राठोड, सुरेखा विद्ये, गीता गिल्डा, अंजली वल्लाकट्टी, कुसूम शेलार, नगरसेविका सोनाली चितळे, प्रदिप परदेशी, अनिल गट्टाणी, ज्ञानेश्वर काळे, अजय चितळे, शशांक कुलकर्णी, प्रा.सुनिल पंडित, नितीन जोशी, लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश साखला, सुमित बटूळे आदी उपस्थित होते.

PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का?

यावेळी भैय्या गंधे म्हणाले, नगरमध्ये पक्षाच्यावतीने बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून पक्षाचे काम वाढत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपप्रणित केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाचे कार्यकर्ते करत असल्याची माहिती आ. शेलार यांना दिली. याप्रसंगी तुषार पोटे यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा सादर केले. ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर महेश नामदे यांनी आभार मानले. यावेळी आ. शेलार यांनी कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटून संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटोळे, ज्ञानेश्वर घेरडे, बाळासाहेब सानप, साहिल शेख, सुधाकर भोसले, किशोर कटोरे, राजू मंगलाराम् आदिंसह भाजपाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा आघाडी, वकिल आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, उद्योग आघाडी आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

जनता जागा दाखवेल

येणाऱ्या काळात जनता महाआघाडी सरकारला जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात पोटनिवडणुकीत दिसून येत आहे. नगरमध्ये भाजपाचे काम चांगले असून पुढील काळात नगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता असेल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या