Sunday, October 18, 2026
HomeनगरCrime News : खासगी प्लॉटचे कुलूप तोडून घुसखोरी; मालकासह सुरक्षारक्षकांना धमकावले

Crime News : खासगी प्लॉटचे कुलूप तोडून घुसखोरी; मालकासह सुरक्षारक्षकांना धमकावले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटल रोडवरील एका खासगी प्लॉटचे गेट आणि पार्किंग ऑफिसचे कुलूप तोडून 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अनाधिकृतपणे घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अविनाश बाळासाहेब कुमार (वय 29, रा. सारसनगर) यांनी बुधवारी (1 जुलै) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुचाबाई चंदन चव्हाण (रा. शास्त्रीनगर, केडगाव), छिदमबाई नारायण चव्हाण (रा. भोसले आखाडा), शास्त्री छोट्या काळे (रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) व इतर अनोळखी 10 ते 15 महिला, पुरूष यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अविनाश कुमार हे चंद्रभान अग्रवाल यांच्याकडे मागील सात वर्षांपासून खासगी नोकरी करतात. अग्रवाल यांचा महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे नं. 125/2 मध्ये एक प्लॉट आहे. या प्लॉटवर तीन व्यक्ती वॉचमन म्हणून काम पाहतात. हा प्लॉट सामाजिक आणि धार्मिक कार्यासह सर्वसामान्यांच्या पार्किंगसाठी विनामूल्य वापरला जातो.

26 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक कर्तव्यावर असताना, संशयितांनी मुख्य गेटवर येऊन सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. त्यांनी गेटचे व पार्किंग ऑफिसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी अविनाश कुमार आणि सुरज अग्रवाल हे तिथे विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...