Tuesday, June 16, 2026
Homeनगरनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरची आठ वाहनांना धडक

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कंटेनरची आठ वाहनांना धडक

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नगर संभाजीनगर महामार्गावर (Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway) पांढरीपूल येथे सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अहमदनगर कडून संभाजीनगरकडे जाणार्‍या कंटेनरने (Container) आठ वाहनांना मागील बाजुने जोरदार धडक (Hit) दिली. काही अंतरावर जाऊन कंटेनर चालकाने आपले ताब्यातील वाहन सोडून पळ काढला.

- Advertisement -

अपघाताची (Accident) माहिती समजताच सोनई पोलीस ठाण्याचे (Sonai Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके हे आपल्या सहकार्‍यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली. जखमींचा (Injured) आकडा समजू शकला नाही.

घाटातील तीव्र उतार आणि पांढरीपूल (Pandhari Pool) येथील हॉटेल समोर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळेही अपघात वाढत आहेत. तीव्र उताराला अवजड वाहने न्यूट्रल करण्यात येत असल्याने वाहनावर चालकाचे नियंत्रण राहत नाही. याबाबीही अपघातास कारणीभूत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम...