Thursday, March 27, 2025
Homeनगरदोन कंटेनरच्या अपघातात चालक ठार

दोन कंटेनरच्या अपघातात चालक ठार

अहमदनगर |तालुका प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway) रविवार दि. 18 रोजी इमामपूर (Imampur) शिवारात दोन कंटेनरच्या अपघातात (Two Container Accident) कंटेनर चालक ठार (Driver Death) झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

श्रीरामपूरकरांची ‘कडकडीत’ एकजूट!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Ahmednagar-Chhatrapati Sambhajinagar Highway) इमामपूर शिवारातील भैरवनाथ मळा येथे रविवारी सकाळी सहा वाजता कंटेनरचा अपघात (Container Accident) झाला. रस्त्यावर नादुरुस्त उभ्या असलेल्या कंटेनरला (एम.एच.40 सी.डी. 4460) नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्‍या कंटेनरने (एम. एच. 05 ए. एम. 7818) पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये कंटेनर चालक संतोष किसन पिसाळ (वय 45 रा. चोराडे, म्हासुरणे. जि. सातारा) हा मयत झाला आहे.

शिंगणापुरात सुमारे तीन लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन

अपघातात (Accident) चालक हा कंटेनरच्या केबिनमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिक व इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, अनिकेत आवारे, सुजय आवारे, वैभव मोकाटे, मच्छिंद्र आवारे, छोटू आवारे, बंटी आवारे, ऋषिकेश आवारे, सुभाष आवारे, बाबासाहेब मोकाटे यांनी कटावणी तसेच पहारीच्या साहाय्याने जखमी चालकास (Injured Driver) बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात (Civil Hospital) दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला आहे.

आता बैलांचे वेदनामुक्त खच्चीकरण!

अपघाता (Accident) नंतर दोन्ही कंटेनर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आडवे झाल्याने संपूर्ण वाहतूक खोळंबली होती. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे (MIDC Police Station) पोलीस हवालदार रमेश थोरवे, संदीप आव्हाड, सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, पोलीस हवालदार गिरवले, सुद्रक तसेच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक सुभाष गवते, बोथरे, वाघमारे सहाय्यक उपनिरीक्षक कवडे, भालसिंग, कोडप पोलीस नाईक शेळके, सईद यांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कंटेनर (Container) बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. सुमारे दोन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

जबरदस्तीने धर्मप्रसार, तीन महिलांवर गुन्हे

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar Highway) अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच सूचनादर्शक फलक, अपघात (Accident) टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघातांची (Accident) संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता दुरुस्ती तसेच सिग्नल व अपघात (Accident) टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सेवानिवृत्त चालकाला 10 लाखांचा गंडा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...