Friday, June 21, 2024
Homeनगरनगर शहरामध्ये भाजपाचे तब्बल दहा उपाध्यक्ष

नगर शहरामध्ये भाजपाचे तब्बल दहा उपाध्यक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

भाजपमधील अंतर्गत वादामुळे शहर व जिल्हा कार्यकारिणीला तब्बल चार महिन्यांनतर मुहूर्त मिळाला. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने भाजपने मोर्चे बांधणी सुरु केली. मात्र, या मोर्चे बांधणीसाठी तब्बल चार महिने प्रतिक्षा करावी लागली. मंगळवारी ही प्रतिक्षा संपली असून भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांनी शहर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यात तब्बल दहा उपाध्यक्ष नेमण्यात आले असून कार्यकारणीची संख्या लक्षात घेता, शहर जिल्हाध्यक्षांनी कोणी ही नारज होणार नाही याची विषेश काळजी घेतलेली दिसत आहे.

यासह शहर भाजपमध्ये आठ सरचिटणीस यांच्यासह मंडल अध्यक्ष आणि आघाडी प्रमुखांचा समावेश करण्यात आलेला आहे. अ‍ॅड. आगरकर यांची भाजप शहरजिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकारिणी निवडीकडे लक्ष लागले होते. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात होती. मात्र, पक्षातील अंतर्गत वादामुळे कार्यकारिणीस तब्बल चार महिने प्रतिक्षा करावी लागली. यात अनेकांची मनधरणी करत जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आगरकर यांची दमछाक झाली. नूतन कार्यकारणीत उपाध्यक्षपदी नगरसेविका सोनाली चितळे, संध्या पावसे, अशोक गायकवाड, अनिल ढवण, अनंत देसाई, धनंजय जाधव, बाबा सानप, महेश झोडगे, प्रवीण ढोणे, तुषार पोटे यांचा समावेश आहेत.

तर सरचिटणीसपदी सचिन पारखी, अनिल मोहिते, प्रशांत मुथा, सविता कोटा, पंडित वाघमारे, महेश नामदे यांना संधी दिली आहे. विविध आघाडत प्रमुख पदी युवा प्रमुखपदी- मयूर बोचुघोळ, महिला आघाडी प्रमुखपदी- सुप्रिया जानवे, किसान आघाडी प्रमुखपदी- राजेंद्र एकाडे, अनुसूचित जाती आघाडी पदी- नरेश चव्हाण, अनुसूचित जमाती आघाडी पदी- महेश शेळके, अल्पसंख्यांक आघाडीत हाजी अन्वर खान, ओबीसीमध्ये- बाळासाहेब भुजबळ. मंडल अध्यक्षांमध्ये नितीन शेलार (सावेडी), राहुल जामगावकर (मध्य नगर), शामराव बोळे (भिंगार), निलेश सातपुते (केडगाव) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या