Saturday, September 21, 2024
Homeनगरमुसळधार पावसाने नगर शहर व परिसराला झोडपले

मुसळधार पावसाने नगर शहर व परिसराला झोडपले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात एक आठवड्यापासून मान्सून दमदार बरसत असून बुधवारी दुपारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दुपारी तीन वाजता नगर शहर आणि परिसरात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. नगर शहरात दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना प्रवासादरम्यान कसरत करावी लागली. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बाजारपेठीतील रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले.

गुलमोहर रस्त्यावरील आनंद शाळेसमोर एका खासगी प्लॉटमध्ये नाल्यात टाकण्यात आलेले पाईप हटवून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यात आला. प्लॉट धारकाचा विरोध डावलून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील पाईप हटवले. मृग नक्षत्र सुरू होताच दुष्काळी परिस्थितीचे चटके सोसलेला नगर तालुका मृगाच्या सरींनी सुखावला. बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी तालुक्यातील विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली. केडगाव, चास, कामरगाव, भोयरे पठार, भोरवाडी, अकोळनेर, सारोळा कासार तसेच जेऊर, इमामपुर, बहिरवाडी, ससेवाडी आदी भागात जोरदार पावसाची बॅटींग झाली. तालुक्यात सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस झाला असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान नगर तालुक्यातील ससेवाडीत ढगफुटी झाल्याने सीना नदीला पुर आला होता. जेऊर बाजार तळ पाण्यात गेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या