Saturday, May 4, 2024
Homeनगरकाँग्रेसची आदळआपट बैठक!

काँग्रेसची आदळआपट बैठक!

अहमदनगर (प्रतिनिधी)

स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार (ncp mla) भाजपशी (bjp) सलगी करत असल्याचा आरोप काँग्रेसने (congress) पुन्हा केला आहे. मंथन बैठकीत सत्ताधारी आमदार आपल्या कोणत्याही आरोपांची दखल घेत नसल्यामुळे उसळलेली संतापाची लाट स्पष्टपणे दिसली. त्यातून महापालिका निवडणुकीत (Municipal elections) थेट भाजपा आव्हान देण्याचा मनसुबा बैठकीच्या निमित्ताने जमलेल्या कार्यकर्त्यांनी केला.

- Advertisement -

सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

नुकत्याच पार पडलेल्या मनपा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (mahavikas aaghadi) सेनेचा (shivsena) उमेदवार उभा होता. त्या उमेदवाराच्या पराभवावर शहर जिल्हा काँग्रेसने बैठकीतून मंथन केले. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करून विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचा सत्कार केल्याने काँग्रेस संतप्त आहे. या भावनांचा उद्रेक बैठकीत झाला.

यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे म्हणाले की, भाजपाच्या केंद्र सरकारने एम्पिरिकल डाटा सादर न केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. त्यामुळे आज ओबीसींचे राजकीय नेतृत्व संपवण्याचा डाव भाजपचा यशस्वी होताना दिसत आहे.

नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या…

शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद म्हणाले की, सीएए, एनआरसीचा मुद्दा पुढे करत या देशांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या भावना भाजपने दुखावल्या. नगर शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाने हजारोच्या संख्येने मोर्चा काढत त्याचा निषेध केला. त्याच जातीवादी भाजपच्या निवडून आलेल्या उमेदवाराचा सत्कार राष्ट्रवादीने केला. यामुळे धर्मनिरपेक्ष असणाऱ्या अल्पसंख्यांक मतदारांचा विश्वासघात राष्ट्रवादीने केला असल्याचा आरोप सय्यद यांनी बैठकीत केला.

ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, काही लोक वरतून निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष मतांसाठी भाजप विरोधी भूमिका असल्याचे नाटक करतात. मात्र अंधारात आपल्या सोयाऱ्यांच्या माध्यमातून भाजपचे काम करतात. ही दुटप्पी भूमिका महाविकास आघाडीचे शहरात नुकसान करणारी आहे. ही मंडळी ना महाविकास आघाडीची आहेत ना भाजपचे आहेत. शहरातील मतदारांनी याचा विचार करण्याचे आवाहन यावेळी गुंदेचा यांनी केले. पोट निवडणुकीचा वस्तूनिष्ठ अहवाल राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाठवण्याचा ठराव बैठकीत पारित करण्यात आला.

PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनिफ शेख, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अक्षय कुलट, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, उपाध्यक्ष अरुण धामणे यांच्यासह पक्षाच्या महिला, युवक, कामगार, विद्यार्थी, वकील, शिक्षक आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. कार्यकर्त्यांच्या भावनांची आपण दखल घेतली आहे, असे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

- Advertisment -

ताज्या बातम्या