Saturday, May 4, 2024
Homeनगरयंदाचे अहमदनगर शहराचे बजेट किती कोटीचे?

यंदाचे अहमदनगर शहराचे बजेट किती कोटीचे?

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या बजेटच्या सभेला मुहूर्त लाभला असून 19 ऑक्टोबरला ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे बजेट किती कोटी रुपयांचे असेल याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

2019-20 चे सुधारीत आणि 2020-21 चे मुळ अंदाजपत्रिक मुख्यलेखाधिकार्‍यांनी नगरसचिव विभागामार्फत महापौर कार्यालयाकडे पाठविले आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मान्यतेने नगरसचिव कार्यालयाने 19 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहात बजेटची ऑनलाईन सभा बोलविली आहे.

- Advertisement -

प्रशासनाने स्थायी समितीला बजेट सादर केले होते. मात्र 45 दिवस स्थायी समितीची सभाच झाली नाही. 45 दिवसांपेक्षा अधिक काळ उलटला गेल्याने बजेट थेट महासभेला सादर करण्यात आले आहे. हे बजेट किती कोटी रुपयांचे असेल याविषयी नगरकरांना उत्सुकता लागून आहे. बजेट मंजूर नसल्याने शहरात विकास कामे खोळंबली होती. आता बजेट मंजूर झाल्यानंतर विकास कामांना गती मिळेल असे सूत्रांकडून सांगितले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या