Tuesday, March 25, 2025
HomeनगरAhmednagar Crime News : महाविद्यालयात जाताना काढली विद्यार्थीनीची छेड

Ahmednagar Crime News : महाविद्यालयात जाताना काढली विद्यार्थीनीची छेड

अहमदनगर । प्रतिनिधी

महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थीनीचा पाठलाग करून छेड काढण्याची घटना तारकपूर रस्त्यावर घडली. या विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तरूणावर तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगरात राहणार्‍या पीडिताने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : महायुतीत वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचा थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा… कारण काय?

विद्यार्थीनी गुरूवारी (29 ऑगस्ट) नेहमी प्रमाणे सकाळी साडे नऊ वाजता महाविद्यालयात जाण्यासाठी हॉटेल थापरजवळून जात होती. त्यावेळेस पांढर्‍या रंगाची एक चार चाकी वाहन समोर उभे होते. सदर वाहना शेजारून जात असताना त्या वाहनाजवळ एक अनोळखी तरूण उभा होता. त्याने वाहनामध्ये बसण्याचा इशारा केला. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने डावा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले.

हे ही वाचा : चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून महिलेला लुटले!

विद्यार्थीनीने घाबरून तेथून पळ काढून सुटका करून घेतली. त्यावेळेस सदर ठिकाणी दुचाकीवर दोन महिला जात असतांना त्यांनी सदर प्रकार पाहिला असता त्या मोठ्याने ओरडल्या. त्यांची दुचाकी थांबवून खाली ऊतरून त्यांनी त्या तरूणाला दगडे फेकून मारले. त्यामुळे तो तरूण घाबरून पळून गेला. ही घटना घरी आल्यावर कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...