Wednesday, May 29, 2024
Homeनगरघराला आग लावण्याचा प्रयत्न

घराला आग लावण्याचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)

घरगुती भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून त्या कुटुंबाच्या घरात आग लावण्याचा प्रयत्न सावेडीत गुरूवारी (दि. 26) रात्री घडला. याप्रकरणी वेदांत अंबादास आकुल (वय 22, रा. प्रशांतनगर, भिस्तबाग चौक) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश बाळकृष्ण रोल्ला (वय 36 रा. प्रशांतनगर, भिस्तबाग चौक) यांनी तक्रार दिली आहे.

- Advertisement -

तक्रारदार रमेश रोल्ला यांच्या शेजारीच वेदांत आकुल राहतो. गुरूवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास आकुल हा दारू पिऊन त्याची आई व वडील यांना शिवीगाळ व मारहाण करीत असताना रोल्ला यांच्या आई शोभा रोल्ला यांनी मध्यस्थी केली.  त्या वेदांतला समजावून सांगत असताना त्याने त्यांना धक्का देऊन ढकलून दिले व निघून गेला. त्यानंतर रमेश रोल्ला व त्यांच्या आई शोभा रोल्ला स्वतःच्या घरी आल्यावर वेदांतने अचानक पाण्याच्या रिकाम्या बाटलीत पेट्रोल वा रॉकेल भरून आणून त्याला आग लावून ती बाटली रोल्ला यांच्या घरात फेकली. त्यामुळे त्यांच्या घरातील चादर, चटईला आग लागली. घरातील व्यक्तींनी धावपळ करून ही आग विझवली. यावेळी वेदांत आकुल याने रोल्ला यांना शिवीगाळ करून तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देऊन तो पळून गेल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या