Saturday, May 17, 2025
Homeनगरभिंगारचा चोर जेरबंद

भिंगारचा चोर जेरबंद

अहमदनगर | प्रतिनिधी

- Advertisement -

भिंगार शहरात (Bhingar City) चोरी करणार्‍याला पोलिसांनी (Plice) अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

साहील राजू काकडे (वय 19 रा. सदर बाजार, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी (Bhingar Camp Police) ही कारवाई केली. काकडे याच्याकडून रोख रक्कम व चोरीचे साहित्य असा 21 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हवालदाराने मागितली दोन हजाराची लाच; ‘लाचलुचपत’नं पकडलं रंगेहात

भिंगारच्या इंदिरानगर (Indiranagar) परिसरात चोरी करणारे दोन इसम नगर-पाथर्डी रोडवरील (Ahmednagar-Pathardi Road) उद्यानामध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस कर्मचारी ए. एन. नगरे, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, अविनाश कराळे, अरूण मोरे यांचे पथक स्थापन करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या.

पोलिसांच्या पथकाने पाथर्डी रोडवरील (Pathardi Road) उद्यान परिसरात आरोपी काकडे याला अटक केली तर त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कार-टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon नांदगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोखरी शिवारात भरधाव इर्टींगा कारने विरूध्द दिशेने जात मालवाहतूक करणार्‍या टेम्पोस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगाव, ता. निफाड...