Tuesday, May 21, 2024
Homeनगरपुण्यात फ्लॅट घेण्यासाठी 25 लाखाची मागणी

पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी 25 लाखाची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)

पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 25 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित विवाहितेने गुरूवारी (दि. 10) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पती व्यकंटेश रामराव वाखारकर, सासू छाया रामराव वाखारकर (दोघे रा. मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे), नणंद डिंपल किशोर ओव्हळ, नणंदेचा पती किशोर ओव्हळ, मधुबाला ओव्हळ, (सर्व रा. विमाननगर, पुणे), सासरे रामराव गणपतराव वाखारकर, सावत्र सासू राजश्री रोहीदास घायाल (दोघे रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फेब्रुवारी 2022 मध्ये फिर्यादीचा विवाह व्यकंटेश वाखारकर याच्यासोबत नगरमध्ये झाला होता. तेव्हापासून डिसेंबर 2022 पर्यंत फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना सासरच्यांनी शारिरीक छळ करून वेळोवेळी उपाशीपोटी ठेवले. पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी आई-वडिलांकडून 25 लाख रूपये घेऊन ये, असे म्हणून घराच्या बाहेर काढून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, फिर्यादी यांनी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने त्यांनी दिलेल्या पत्रानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या