Wednesday, May 29, 2024
Homeनगरबस प्रवासात चार तोळ्याचे दागिने लांबविले

बस प्रवासात चार तोळ्याचे दागिने लांबविले

अहमदनगर | प्रतिनिधी

महिलेने गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने पर्स मध्ये काढून ठेवले असता ते प्रवासादरम्यान एका महिलेने चोरले. राहुरी ते नगर बस प्रवासादरम्यान गुरूवारी (दि. 26) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी गितांजली विजय सुर्यवंशी (वय 38 रा. मांजरी, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

सुर्यवंशी यांच्या मामाच्या मुलाचे लग्न राहुरी येथे असल्याने त्या पुणे येथून राहुरी येथे आल्या होत्या. त्या गुरूवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास लग्नाचा कार्यक्रम आटपुण त्यांची मावस बहिण रेखा आडसुळ यांच्या सोबत राहुरी बस स्थानकावर आल्या. तेथून त्या नंदुरबार ते पुणे बस मध्ये बसून पुढील प्रवासासाठी निघाल्या. दरम्यान, बस मध्ये खूप गर्दी असल्याने त्या उभ्या होत्या. त्यांच्या जवळच एक महिला देखील उभी होती.

ती सुर्यवंशी यांना म्हणाली,‘तुम्ही गळ्यात खूप सोने घातले आहे, तुम्ही ते काढून ठेवले पाहिजे’, सुर्यवंशी यांनाही तिचे म्हणणे पटल्याने त्यांनी गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चैन, एक तोळ्याची सोन्याची ठुशी काढून पर्स मध्ये ठेवली. सुर्यवंशी यांच्या जवळ असलेली महिला नागापूर बस स्टॉपवर उतरली व त्यानंतर सुर्यवंशी यांनी त्यांची पर्स पाहिली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांना दिसले नाही. त्यांनी सावेडी बस स्थानकावर बस थांबून तोफखाना पोलीस ठाणे गाठले. बस प्रवासादरम्यान महिलेने दागिने चोरले असल्याचा त्यांचा संशय असून त्यानुसार त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या