Friday, April 25, 2025
HomeनगरCrime News : रस्त्याच्या वादातून वृध्द महिलेला मारहाण; सहा जणांविरूध्द गुन्हा

Crime News : रस्त्याच्या वादातून वृध्द महिलेला मारहाण; सहा जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)

रस्ता बंद केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून वृध्द महिलेला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ससेवाडी (ता. नगर) शिवारात घडली.

- Advertisement -

भीमाबाई एकनाथ मगर (वय 62 रा. ससेवाडी) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहदेव मिठू मगर, सुरज बाबासाहेब मगर, तुकाराम दत्तात्रय मगर, नितीन बबन मगर, सौरभ भाऊसाहेब मगर, अभिषेक भाऊसाहेब मगर (सर्व रा. मगर वस्ती, ससेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपी यांनी ससेवाडी शिवारातील डोंगरात जाणार्‍या रस्त्यावर गवत टाकून रस्ता बंद केला होता.

याबाबत फिर्यादी यांनी संशयित आरोपींना विचारले असता त्यांना राग आला. त्यांनी सर्वांनी मिळून फिर्यादीला लाकडी दांडके, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या मुलाला व पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी फिर्यादी यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस अंमलदार थोरवे अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...