Friday, May 24, 2024
Homeनगरचार बांगलादेशींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

चार बांगलादेशींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अहमदनगर (प्रतिनिधी)

दलालामार्फत अवैधरित्या भारतात घुसखोरी करणार्‍या व नगर शहराजवळून अटक केलेल्या चार बांगलादेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना घुसखोरी व कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणार्‍या अब्दुल कादीर (रा. बांगलादेश) याला पोलिसांच्या मुंबई एटीएसच्या पथकाने मुंबईतूनच अटक केली आहे. त्याला लवकरच

- Advertisement -

नगरच्या गुन्ह्यात हस्तांतरीत करून घेणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक व नगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने नगर शहराजवळ चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. चौघा घुसखोरांना सहाय्य करणार्‍या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अब्दुल कादीर या बांगलादेशी नागरिकाला मुंबईतून एटीएस पथकाने अटक केली आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या