Sunday, May 26, 2024
Homeनगरमनमाड रस्त्यावर लुटमार करणारी राहुरीची टोळी गजाआड

मनमाड रस्त्यावर लुटमार करणारी राहुरीची टोळी गजाआड

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर-मनमाड महामार्गावर लुटमार करणारी राहुरी येथील सराईत गुन्हेगारांची टोळी एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीत चौघांचा समावेश आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नागेश संजय चव्हाण (वय 23 रा. मोबीन आखाडा, राहुरी), अक्षय उत्तम माळी (वय 19), संकेत उर्फ सनी सोपान बर्डे (वय 22), किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने (वय 30, तिघे रा. झोपडपट्टी, राहुरी) अशी गजाआड केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

- Advertisement -

अनिल मोहन म्हस्के (वय 36 रा. देहरे ता. नगर) हे 9 जुलै 2023 रोजी नगर- मनमाड महामार्गावरून दुचाकीवर देहरे शिवारातून जात असताना त्यांच्या दुचाकीला चौघांनी दुचाकी आडवी लावून आमच्याकडील गोणीमध्ये तलवारी आहे, तुला जिवंत मारू, अशी धमकी दिली होती. म्हस्के यांच्याकडील दुचाकी व मोबाईल असा एक लाख 10 हजार रूपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी म्हस्के यांनी 10 जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू असताना सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार नागेश चव्हाण, अक्षय माळी, संकेत उर्फ सनी बर्डे, किरण उर्फ हुंगा जगधने यांनी केला असुन ते राहुरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्या चौघांना राहुरी येथून ताब्यात घेत गजाआड केले आहे.

सदरची कारवाई सपोनि राजेंद्र सानप, पोसई चांगदेव हंडाळ, अंमलदार चव्हाण, किशोर जाधव, गजानन गायकवाड, नवनाथ दहिफळे, अक्षय खेसे, पडवळे तसेच मोबाईल सेलचे रिंकु मढेकर, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या