Saturday, July 27, 2024
HomeनगरLCB ची सतर्कता! दरोड्याच्या तयारीत असलेली 11 जणांची टोळी गजाआड

LCB ची सतर्कता! दरोड्याच्या तयारीत असलेली 11 जणांची टोळी गजाआड

अहमदनगर (प्रतिनिधी)

दरोड्याच्या तयारीत असलेली 11 जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेंडी- मनमाड बायपास रस्त्यावर पकडली. त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीकडून एक तलवार, तीन सुरे, कटर, फायटर, स्क्रु ड्रायव्हर, लाकडी दांडके, गलोल, मिरचीपुड, तीन विविध कंपनीचे मोबाईल फोन तसेच टाटा व आयशर कंपनीचे दोन ट्रक असा एकुण 35 लाख 62 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

अरशद हसन खान (वय 37, रा. अलवर, शिवाजीपार्क, राज्य राजस्थान), मोबीन जगमाल खान (वय 43), अहमद उस्मान खान (वय 38), खलीलमहंमद इसराईल खान (वय 35), सुनील रामअवतार कुमार (वय 24), खुर्शिद मंगल खान (वय 45), मोहमंद आरिफ जोरमल (वय 28, सर्व रा. बुबल्हेरी, मेवात, राज्य हरीयाणा), हासिम बसरू खान (वय 25), अलीम करीउद्दीन खान (वय 25, दोन्ही रा. गनौर नगिना, नुह, राज्य हरीयाणा), ताजमहंमद रहेमान (वय 45, रा. आखेडा, नुह, राज्य राजस्थान), रईस इसाक खान (वय 45, रा. लोहिंगा, पिपरवली, राज्य हरीयाणा) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, त्यांच्यातील मोहमंद अफजल जोरमल (रा. नुह, राज्य हरीयाणा) व तय्यब मंगलखान (रा. बुबल्हेरी, नुह, राज्य हरीयाणा) हे दोघे पसार झाले आहेत.

Talathi Exam Schedule : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून होणार परिक्षा सुरू

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेऊन कारवाई करत असताना शेंडी ते मनमाड जाणार्‍या बायपास रस्त्यावर, हॉटेल किनाराचे पुढे अंधारात काही लोक राजस्थान व हरीयाणा पासींगच्या दोन ट्रकमधून येऊन गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत दबा धरून बसलेले आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला सदर ठिकाणी रवाना करून कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन ट्रक रस्त्याचे कडेला लावुन, काही संशयीत इसम अंधारात दबा धरून बसलेले पथकास दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आल्याची कबुली दिली.

चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले Chandrayaan 3; आता फक्त १४३७ किलोमीटर बाकी

सदरची कामगिरी निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, अतुल लोटके, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, संतोष लोढे, सचिन आडबल, संतोष खैरे, फुरकान शेख, आकाश काळे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, अशोक गुंजाळ, प्रशांत राठोड व भरत बुधवंत यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या