Tuesday, April 29, 2025
Homeनगरसर्जेपुरातील हुक्का पार्लरवर आयजी पथकाचा छापा

सर्जेपुरातील हुक्का पार्लरवर आयजी पथकाचा छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)

सर्जेपुरा भागातील हॉटेल एम. एच. 16 ब्राऊन लिफ येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या पथकाने गुरूवारी (दि. 20) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान 11 हजार 200 रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी हॉटेल मालक, तीन कामगारांसह हुक्का ओढणार्‍या पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शेख शकील अहमद यांनी फिर्याद दिली आहे. हॉटेल मालक कृष्णा अशोक इंगळे (रा. नगर), वेटर प्रकाश धरम महातरा (मुळ रा. नेपाळ, सध्या रा. नगर), कामगार आमीन व प्रशांत (पूर्ण नावे माहिती नाही), हुक्का ओढणारे प्रदीप प्रशांत मेहता (वय 28 रा. झेडपी कॉलनी), अर्जुन लिंबराज पाडळे (वय 25 रा. इसळक, निंबळक ता. नगर), मोतीलाल प्रकाश भट (वय 24 रा. झेडपी कॉलनी, नगर), सौरभ राजेंद्र कनोजिया (वय 27 रा. गोविंदपुरा, भिंगार), अंकित कालिका मौर्य (वय 26 रा. नागापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

सर्जेपुरा भागातील एका हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. त्यांनी गुरूवारी सायंकाळी पंचासमक्ष संबंधीत ठिकाणी छापा टाकला असता पाच जण हुक्का ओढताना मिळून आले. हॉटेल मालक व दोन कामगार पसार झाले. वेटरला पथकाने पकडले. नऊ जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने टॅक्सीला उडवलं, ६ जणांचा जागीच मृत्यू… घटना CCTVत कैद

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दाखल पात्र विद्यार्थ्यांसोबत निरक्षर व्यक्ती शोधा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून साक्षर केले जाणार आहे. यासाठी...