Sunday, June 8, 2025
HomeनगरAhmednagar Crime News : धक्कादायक! दारूच्या नशेत भावानेच केला भावाचा खून

Ahmednagar Crime News : धक्कादायक! दारूच्या नशेत भावानेच केला भावाचा खून

कर्जत | प्रतिनिधी

- Advertisement -

सख्ख्या चुलत भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे रविवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

राक्षसवाडी बुद्रुक येथील विकास दिलीप शिंदे (रा. राक्षसवाडी बुद्रुक, वय ३०)असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पप्पू शांतीलाल शिंदे (रा. बेलवंडी) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक व कर्जत पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पप्पू शिंदे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ठाकरे व पवार यांच्या एकत्रिकरणाच्या निव्वळ चर्चा – मंत्री...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उध्दव ठाकरे व मनसे तसेच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत. या पक्षांचे अधिकृत प्रवक्ते ज्यावेळी यावर स्पष्ट भाष्य...