Tuesday, July 2, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलांची धिंड प्रकरण: गुन्ह्यात अपहरण, पोस्कोचे कलम वाढविले

अल्पवयीन मुलांची धिंड प्रकरण: गुन्ह्यात अपहरण, पोस्कोचे कलम वाढविले

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

एमआयडीसीतील अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढणार्‍या संशयित 13 आरोपींवर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी भा.द.वि. कलम 364 अन्वये अपहरणाचे, बाल लैंगिक अत्याचार पोस्को कलम 12 सह बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 75 वाढविले आहे.

यामुळे संशयित आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात सुरूवातीला चार व नंतर दोन अशा सहा जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित अद्यापही पसार आहेत.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे कडक कारवाईची आणि या प्रकरणाच्या खरा मास्टरमाईंडचा सखोल चौकशी करत शोध घेण्याची मागणी केली होती.

दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या संदर्भामध्ये पोस्को आणि बाल न्याय अधिनियमाचे कायदे अत्यंत कडक आहेत. संशयित आरोपींनी त्या मुलांची अर्धनग्न धिंड का कडू नये ? असे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणत पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतर मात्र एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये कडक कारवाई करत संशयित आरोपींविरूध्द वाढीव कलम लावले असून त्यांचा फास आवळला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या