Wednesday, May 29, 2024
Homeनगरएलसीबीचा ‘स्टार बर्ग’ हुक्क्यावर छापा

एलसीबीचा ‘स्टार बर्ग’ हुक्क्यावर छापा

अहमदनगर (प्रतिनिधी)

बालिकाश्रम रस्त्यावर सुरू असलेल्या स्टार बर्ग हुक्का पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी (दि. 17) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 21 हजार 100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

हुक्का पार्लरचा मालक राम बापु भागवत (वय 23 रा. घासगल्ली, कोठला), हुक्का ओढणारे अमिन इकबाल शेख (वय 22 रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता), शिवम सोमनाथ शिंगटे (वय 19 रा. वंजारगल्ली, मंगलगेट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राम बापु भागवत हा बालिकाश्रम रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये स्टार बर्ग नावाने हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार संदीप पवार, रवींद्र कर्डिले, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, उमाकांत गावडे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय जपे, अहमद इनामदार व पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. हुक्का पार्लरचे साहित्य जप्त केले असून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या