Monday, May 20, 2024
Homeनगरपोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर खूनी हल्ला

पोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर खूनी हल्ला

अहमदनगर|Ahmedagar

गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला मारहाण करण्यात आल्याची घटना भिंगार (Bhingar) मध्ये रविवारी रात्री घडली. या मारहाणीत सादीक लाडलेसाहब बिराजदार (वय-३२ रा. मुकुंदनगर) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रात्री रुक्सार सादीक बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल झाल्यामध्ये मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांचा समावेश आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा दाखल असलेला आरोपी सादीक बिराजदार याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता आरोपीच्या घरी गेले होते.

त्याला घेऊन जात असताना पाच आरोपींनी भिंगार नाल्याजवळ (Bhingar Nala) पोलिसांचे वाहन (Police) अडवून सादिकला मारहाण केली. ही घटना मी प्रत्यक्षात पाहिली असल्याचे रुक्सार सादिक हिने फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेला सादिक याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या