Monday, May 27, 2024
Homeनगरसभेचा फलक काढला; शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

सभेचा फलक काढला; शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

सोमवारी (दि. 16) येथील फिरोदीया हायस्कूलच्या मैदानावर होणार्‍या सभेच्या अनुषंगाने सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकात लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे फलक मनपाने हटवले. दरम्यान, फलक हटविताना मनपा कर्मचार्‍याकडून शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात मनपा कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सागर जपकर (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे. कुणाल सुनील भंडारी (वय 29 रा. आनंदनगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पुर्ण होत असल्याने भंडारी यांनी सोमवारी नगर शहरातील फिरोदीया हास्कूलच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘एकरात्र गडावर’ हे नाटक व हिंदुत्वादी नेते व तेलंगणचे आमदार टी. राजासिंह यांची सभा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्यभिषकाचे फोटो व इतर मजकुर असलेले फलक लावण्यात आले होते. ते मनपा अतिक्रमण विभागाने गुरूवारी (दि. 12) सायंकाळी काढले. दरम्यान, फलक काढतेवेळी कर्मचार्‍यांकडून दक्षता घेतली गेली नाही त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. याप्रकरणी शिवप्रेमींनी शुक्रवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी भंडारी यांच्या फिर्यादीवरून सागर जपकर या कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या