अहमदनगर (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला म्हणून एका तरूणाने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातून आरोपी महिलेने दोषमुक्त करावे, असा अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी हा अर्ज फेटाळून लावला. अॅड. गोरक्ष पालवे यांनी मूळ फिर्यादीतर्फे काम पाहिले.
राहुरी तालुक्यातील एका गावातील तरूण, त्याचे वडील व कुटुंबियाविरूध्द राहुरी तालुक्यातीलच व्यक्तींनी शेताच्या वादावरून विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यामध्ये सदरील तरूणास अटक करण्याची धमकी देऊन त्याचे करिअर उध्वस्त करण्याची धमकी दिली होती. या धमकीस घाबरून तरूणाने येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये स्वतःला पेटवून घेतले होते. आत्महत्या करणार्या तरूणाच्या जबाबदावरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. महिलेच्या दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला. तरूणाच्या वडिलांच्या वतीने अॅड. पालवे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. सागर गर्जे, अॅड. बाळकृष्ण गीते, अॅड. रोहित बुधवंत, अॅड. गुरविंदर पंजाबी, अॅड. अंकिता सुद्रिक, अॅड. धनश्री खेतमाळस यांनी सहाय्य केले.