Monday, May 27, 2024
Homeनगरअल्पवयीन मुलीस छेडणार्‍याला पकडले

अल्पवयीन मुलीस छेडणार्‍याला पकडले

अहमदनगर (प्रतिनिधी)

अल्पवयीन मुलीस पळविण्याचा प्रयत्न करणार्‍याला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी पकडून पाहुणचार करत तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. नगर-औरंगाबाद महामार्गावर पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ गुरूवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी मुलगी सव्वाचार वाजता घरी जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने जात होती. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील यशवंत कॉलनीतील शोभा सदन बंगल्याजवळ ती आली असता बुलेटवर आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तीने मुलीचा हात धरून गैरवर्तन केले. बुलेटवर बसण्यासाठी धमकावले, या मुलीने बुलेटवर बसण्यास नकार दिला असता दुसर्‍या एका दुचाकीवर आलेल्या आणखी एकाने धमकावले. अल्पवयीन मुलीने मदतीसाठी आरडाओरड केल्यावर चौकात असलेले पोलीस, नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी बुलेटवरील तरूणास पकडले. त्यास पाहुणचार करत तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

त्याचे नाव विचारले असता सुजित बाजीराव तोडमल (वय 23, रा. संभाजीनगर, तपोवन रस्ता, सावेडी) असे सांगितले तसेच त्याचा साथीदार गौरव एडके (रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे असल्यास सांगितले. पोलिसांनी त्याची बुलेट (एमएच 16 सी के 6713) ताब्यात घेतली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सुजित तोडमल, गौरव एडके आणि एका अनोळखी तरूण अशा तिघांविरूध्द अपहरण करणे, विनयभंग करणे, धमकावणे, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या