Tuesday, July 2, 2024
HomeनगरCrime News : शासकीय जमिनीतून अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिजाची चोरी

Crime News : शासकीय जमिनीतून अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिजाची चोरी

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

नगर तालुक्यातील कापुरवाडी शिवारातील शासकीय जमिनीतून अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिजाची चोरी केल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द सामुहिक चोरी, फसवणूकसह माईन्स अ‍ॅड मिनरल अ‍ॅक्ट 1957 चे कलम 4 व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडल अधिकारी जीवन भानुदास सुतार (वय 49 रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. ऋषीकेश संभाजी भगत, महादेव परसराम भगत, भैरवनाथ जनार्धन भगत, गणेश विठ्ठल भगत, सतीष विठ्ठल भगत, अनिरूध्द संजय लाकुडझोडे व सुधीर संजय लाकुडझोडे (सर्व रा. कापुरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सदरचा प्रकार 27 जून रोजी दुपारी एक ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला असून 29 जून रोजी दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील संशयित आरोपींनी गौण खनिजाची चोरी करून 10 लाख 37 हजार रूपयांचा महसूल बुडून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित आरोपी हे कापुरवाडी शिवारात अनधिकृतरित्या के्रशर चालवितात. यासाठी लागणारा कच्चा माल त्यांनी कापुरवाडी शिवारातील शासकीय जमीन सर्व्हे नंबर 269 मधून अवैधरित्या उत्खनन करून त्याची चोरी केली. कोणत्याही प्रकारचा वाहतुक परवाना व विक्री परवाना त्यांच्याकडे नसतानाही त्यांनी सदरचा उत्खनन केलेला माल खासगी जमिनीत साठवणूक केला.

सदरचा प्रकार मंडलअधिकारी जीवन सुतार व त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास पोलीस अंमलदार ए. एन. नगरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या