Saturday, April 26, 2025
Homeनगरचोरी करताना तीन महिलांना पकडले

चोरी करताना तीन महिलांना पकडले

अहमदनगर (प्रतिनिधी)

चोरीचा प्रयत्न करत असताना तीन महिलांना नागरिकांनी पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. गुरूवारी (दि. 27) सकाळी सहा वाजता सावेडी गावातील हॉटेल पूर्णा समोरील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. पकडलेल्या महिलांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संदीप दत्तात्रय वाकळे (वय 45 रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. वंदना विजय घोरपडे (रा.लालटाकी), कविता (पूर्ण नाव माहिती नाही) व आणखी एक महिला यांना पकडण्यात आले आहे. संदीप वाकळे यांचे सावेडी गावात स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये क्रोणा नावाचे जिम साहित्याचे दुकान आहे. या दुकानात ऍमेझॉन मालाची गाडी खाली करून घेत असताना त्यांच्या जिमच्या बाहेर कंपाऊंड परिसरात पडलेले सामान वंदना घोरपडे व इतर दोघी चोरी करत असताना वाकळे यांच्या लक्ष्यात आले. वाकळे यांनी इतरांच्या मदतीने त्यांना पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान, वंदना घोरपडे हिने यापूर्वी देखील सदर ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिला पोलीस अंमलदार प्रमिला गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...