Friday, April 25, 2025
HomeनगरAhmednagar Crime News : मंदिरात काम करणार्‍या तरूणाला मारहाण करून लुटले

Ahmednagar Crime News : मंदिरात काम करणार्‍या तरूणाला मारहाण करून लुटले

अहमदनगर । प्रतिनिधी

सावेडीतील परीचय हॉटेलच्या पाठीमागे खंडोबाच्या मंदिरात फर्शी बसवण्याचे काम करणार्‍या तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील पाच हजाराची रोकड, अर्धा तोळ्याची अंगठी व कागदपत्रे काढून घेतले.

- Advertisement -

साईनाथ नाथा गायकवाड ((वय 35 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. गुरूवारी (3 ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयुर बापू भिंगारदिवे (रा. सावेडी) व त्याच्या सोबतचे अनोळखी तिघे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी खंडोबा मंदिरात गुरूवारी दुपारी फर्शी बसविण्याचे काम करत होते. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास तेथे भिंगारदिवे व इतर तिघे आले. काही एक कारण नसताना भिंगारदिवे म्हणाल, ‘तु येथे कोणाला विचारून काम करतो’.

फिर्यादी त्याला म्हणाले, ‘नगरसेवक बारस्कर साहेबांचे काम करतो’. भिंगारदिवे सोबतच्या दोन अनोळखी व्यक्ती मंदिरात जाण्याचा प्रयत्न करू लागले असता फिर्यादीने त्यांना विरोध केला. त्याचा त्यांना राग आल्याने भिंगारदिवेसह चौघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्टीने मारहाण केली. त्यांच्या खिशातील पाकिट व अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेतली. पाकिटात पाच हजार रूपये आधारकार्ड, एटीएम कार्ड होते.

दरम्यान, त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी फिर्यादीने तेथून पळ काढला. भावाला माहिती देऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...