Sunday, September 8, 2024
Homeनगरहद्दपारीचे उल्लंघन करणार्‍या तरूणास अटक

हद्दपारीचे उल्लंघन करणार्‍या तरूणास अटक

अहमदनगर (प्रतिनिधी)

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी नगर प्रांताधिकार्‍यांनी गुन्हेगारीच्या व्यक्तींना हद्दपार केले आहे. या हद्दपारीचे उल्लंघन करून घरी आलेल्या तरूणास कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सद्दाम शकील सय्यद (वय 27) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर पार्श्‍वभूमीवर नगर प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी शहरातील काही तरूणांना तीन दिवसांसाठी हद्दपार केले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार प्रमोद लहारे, शाहिद शेख, सुमित गवळी, दीपक रोहकले हे शहरातील हद्दपार तरूणांच्या वास्तव्याची पडताळणी करत होते. शहरातील इम्पिरिअल चौकातील हाजी इब्राहिम बिल्डिंगमधील सद्दाम सय्यद याला हद्दपार केलेले होते. तो घरी आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आले. प्रमोद लहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सय्यद याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या