Monday, May 20, 2024
Homeनगरनदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे पाडा

नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे पाडा

अहमदनगर | प्रतिनिधी

नगरचे आमदारच (Ahmednagar MLA) पूररेषा रद्द करुन बांधकामाची परवानगी शासन दरबारी मागत आहेत, हे दुर्दैव आहे. सीनानदी पूर नियंत्रण रेषा (Sina river flood control line) रद्द करु नये तसेच नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकामे (Illegal constructions) पाडावीत, अशी मागणी ग्राहक संघाच्या नगर शाखेचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष बापट (Shirish Bapat) यांनी केली आहे.

- Advertisement -

आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

बापट म्हणाले, आपल्या आमदारांनी सीनानदी पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली असून पुर नियंत्रण रेषाच रद्द करावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू केले आहेत. या बातमीतील शाई वाळत नाही तोच सीना नदीने आपले अस्तित्व दाखवून दिले. चार दिवसांत सीना नदीला पूर आला. पूर येण्याचे मुख्य कारण म्हणजे अरुंद होत चाललेले नदीचे पात्र, पात्रात झालेले अतिक्रमण व वाळू उपसा हे होय. आमदार पूररेषाच रद्द करुन बांधकामाची परवानगी शासन दरबारी मागत आहेत हे नगरकरांचे दुर्दैव आहे.

मोठ्या भागाला धोका

सीना नदी (Sina River) पात्र पुररेषेचा 14 किलोमीटर परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यास त्याचा फटका फक्त नदीपात्रात असणार्‍या बेकायदेशीर बांधकामांनाच नव्हे तर लक्ष्मीकारंजा, आनंदी बाजार, नालेगाव, नेप्ती नाका, बागरोजा हडको, दिल्ली दरवाजा परिसर, चितळेरोड, गौरी घुमट, नेता सुभाष चौक, लोखंडी पुलाच्या दोन्ही बाजूला झालेली वसाहत या भागालाही पुराचा धोका आहे, असे बापट यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या