Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी करणार

नगर जिल्ह्यात नाफेड कांदा खरेदी करणार

लासलगाव |वार्ताहर| Lasalgav

कांदा भाव कोसळल्यामुळे केवळ शेतकरी हित लक्षात घेऊन नाफेड पर्याय होता म्हणून फार्मा प्रोडुस कंपनी या एजन्सीद्वारे तातडीने कांदा खरेदी सुरू केली मात्र विरोधक व संघटना कडून चुकीची माहिती पसरवली जात आहे त्याचा निषेध व्यक्त करत जर शेतकर्‍यांना नाफेड परवडत नसेल तर खरेदी मागे घेण्यात येईल असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, नाफेडचे अधिकारी सुशील कुमार यांनी लासलगाव येथे दोन दिवसात आणखी दोन केंद्र सुरू करण्यात येणार असून नगर, पुणे या ठिकाणी केंद्र सुरू करण्याची तयारीझाली असल्याचे सांगितले.

नाफेड एजन्सी द्वारे लासलगाव कोटमगाव रोडवरील खरेदी केंद्रास राज्यमंत्री भारती पवार यांनी. भेट देऊन शेतकरी व नाफेडचे अधिकारी समवेत चर्चा केली त्यांच्या समवेत लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती सुवर्णाताई जगताप माजी जि प सदस्य डी के जगताप शिवसेनेचे प्रकाश पाटील उपस्थित होते.

केंद्रावर कांदा विक्री साठी आलेल्या शेतकरी व नाफेड च्या अधिकार्‍या कडे व्यापार्‍या कडून कांदा खरेदी केली जाते का अशी विचारणा केली. मात्र विरोधक खोटा प्रचार करीत आहे असे सांगून भारती पवार म्हणाला की लाल कांद्याची टिकाऊ क्षमता कमी असते म्हणून या पूर्वी कधीही लाल कांदा नाफेड ने खरेदी केला नाही.

सध्या शेतकर्‍यानं मिळणारे भावात उत्पादन खर्च निघत नाही म्हणून शेतकरी अडचणीत आला असल्याने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत नाफेडकडे सक्षम यंत्रणा नसताना खरेदी सुरू केली आहे. राज्य सरकारने गठित केलेल्या समितीचा अहवाल येताच सकारत्मक निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असे त्यांनी सांगितले. नाफेडची खरेदी सुरू होण्याअगोदर 450 रुपये क्विंटल भावानेकांदा विक्री होत होता आता 950 रूपये क्विंटल दराने विक्री होत असल्याने समाधानाचे वातावरण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या