Friday, October 18, 2024
Homeनगरजिल्ह्यातही पाऊस; शेवगावात दमदार, श्रीरामपूर, अकोले, संगमनेरातही हजेरी

जिल्ह्यातही पाऊस; शेवगावात दमदार, श्रीरामपूर, अकोले, संगमनेरातही हजेरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रविवारी दिवसभर नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरासह परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे सायंकाळी आणि रात्री वातावरणातील गारवा वाढला होता. शेवगाव तालुक्यात दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील गदेवाडी, दहिगाव शे, रावताळे कुरुडगाव, घोटण, एरंडगाव धस, भागवत एरंडगाव, लाखे फळ आदी परिसरात दमदार पाऊस झाल्याची माहिती शेवगावचे शहर प्रतिनिधी यांनी कळवली आहे. श्रीरामपूर शहर व तालुक्यात अधूनमधून पाऊस कोसळत होता. संगमेनरात दुपारी आणि सायंकाळी आषाढ सरी कोसळल्या. अकोलेच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात रविवारपासून मंगळवारपर्यंत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, काल दिवसभर नगरशहरासह जिल्ह्यात दमट वातावरण होते. दुपारनंतर शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शेवगाव तालुक्यात मात्र दमदार पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस तालुक्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, शेवगाव तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे गदेवाडी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. रविवारी शेवगावचा आठवडे बाजार त्यात लग्नतिथी असल्याने बाजार करू व नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.

शेतकर्‍यांना सर्वदूर जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. शासनाने शेवगाव तालुक्यासाठी 2023-24 खरीप हंगामासाठी 9 कोटी 77 लाख रुपयांचा पिक विमा मंजूर केला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यातील 46 हजार 978 शेतकर्‍यांनी शासनाच्या एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग नोंदविला. त्यासाठी 90 हजार 534 अर्ज दाखल करण्यात आले होते. राज्य सरकारचे 25 कोटी 50 लाख 92 हजार 348 रुपये तर केंद्र सरकारचे 13 कोटी 83 लाख रुपये अशी 39 कोटी 35 लाख रुपये रक्कम विमा कंपनीकडे भरली होती. मात्र, शेतकर्‍यांच्या पदरात अपेक्षित रक्कम मिळाली नाही. शेवगाव तालुक्यात कपाशी, तूर आदी पिकांचे विक्रमी क्षेत्र असतांना विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना पिक विमाचा लाभ देताना कपाशी, तूर आदि पिकांचा भरपाई देताना विचार केला नाही. शेतकर्‍यांना सरकट विमा मिळावा, यासाठी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे कृषी विभागाला निवेदन दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या