Monday, September 23, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यासाठी 1 कोटी 56 लाख रूपयांचे अनुदान

नगर जिल्ह्यासाठी 1 कोटी 56 लाख रूपयांचे अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी 2022-23 या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते मार्च 2023 करीता 30 कोटी रूपयांचे अनुदान वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील या योजनेखालील लाथार्थ्यांना 92 लाख 37 हजार 600 रूपयांचा समावेश आहे.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर 2022-23 या कालावधीच्या खर्चासाठी 25 कोटी रूपयांच्या रकमेस मान्यता दिली आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या 64 लाख 6हजार 100 रूपयांचा समावेश आहे.

संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना एकूण 1 कोटी 56 लाख 43 हजार 700 रूपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या