Tuesday, March 25, 2025
Homeनगरजिल्ह्याला मिळाले सहा नवे पोलीस निरीक्षक

जिल्ह्याला मिळाले सहा नवे पोलीस निरीक्षक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांनी राज्यातील पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांची बाहेरच्या जिल्ह्यात बदली झाली असून सहा पोलीस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत.

- Advertisement -

पोलिसांच्या बदलीसाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे मे महिन्यात होणार्‍या बदल्या जून महिन्यात झाल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी बदलीबाबत आदेश नुकतेच काढले आहेत. यामध्ये नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले व अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुभाष भोये यांची नाशिक शहर येथे बदली झाली आहे. जिल्हा जातपडताळणी समितीमध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण यांची महामार्ग सुरक्षा पथकात बदली झाली आहे.

जिल्हा पोलीस दलातील चौघांना मागील महिन्यात पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. तसेच दोन पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त होती. त्या रिक्त जागेवर आता नवीन सहा पोलीस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आले आहेत. पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असणारे हरिष खेडकर यांची नगर जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे. याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागातून नितीनकुमार चव्हाण, लातूरवरून सोपान शिरसाठ, रायगडवरून प्रदीप देशमुख, कोल्हापूरवरून अशोक भवड, सोलापूर ग्रामीणवरून धनंजय जाधव हे निरीक्षक जिल्हा पोलीस दलात बदलून आले आहेत.

तिघे अजूनही रजेवर

राहुरी पोलीस ठाण्यात असताना वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नेवासा पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक विजय करे व पारनेर पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक घन:श्याम बळप हे तिघे निरीक्षक अनेक दिवसांपासून रजेवर गेले आहेत.

येथे ‘प्रभारी’राज

राहुरी, राहाता, सायबर पोलीस ठाण्यात प्रभारी राज असून त्याठिकाणी पूर्णवेळ निरीक्षक मिळालेले नाही. याशिवाय शेवगाव पोलीस ठाण्याचा पदभार परि. पोलीस अधीक्षक, संगमनेर तालुका व कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार परि. पोलीस उपअधीक्षकांकडे देण्यात आला आहे. तेथे पूर्णवेळ पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....