Tuesday, May 21, 2024
Homeनगरजिल्ह्यासाठी आणखी आठ फिरते पशूचिकित्सालय

जिल्ह्यासाठी आणखी आठ फिरते पशूचिकित्सालय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील पूशधनाला तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी पशूसंवर्धन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून आठ फिरते पशूचिकित्सालय मंजूर झाले आहेत. यातील चार पशूचिकित्सालय (वाहने) पशूसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून येत्या दोन दिवसात उर्वरित चार वाहने मिळणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी पाच फिरते पशूचिकित्सालय असून त्यात आणखी आठची भर पडल्याने जिल्ह्यातील पशूधनाला तातडीने पशूचिकित्सेचा लाभ मिळणार आहे.

- Advertisement -

नगर जिल्हा आकारमानाने मोठा आहे. जिल्ह्यात असणार्‍या पशूधनाची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पशूधनाला वेळेत आणि मागणीनूसार उपचार व्हावेत, यासाठी पशूसंवर्धन मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नव्याने आठ फिरते पशूचिकित्साल मंजूर झाले आहेत. या फिरत्या चिकित्सालयामुळे पशूधनावर तातडीने उपचार करणे, गरज भासल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया यासोबतच त्यांना कृत्रिम रेतनाची सुविधा देता येणार आहे.

अकोले, कोपरगाव, राहाता, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा आणि राहुरी या ठिकाणी हे नवीन फिरते पशूचिकित्सालय मंजूर झाले असून यातील राहुरी, पाथर्डी, अकोले आणि राहाता या ठिकाणचे पशूचिकित्सालयाचे वाहन प्राप्त झाले असून उर्वरित चार ठिकाणची वाहने दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पशूधनावर मागणीनूसार वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात आता पूर्वीची पाच आणि आताची आठ अशी 13 फिरते पशूचिकित्सालय यांची संख्या झाली असल्याचे पशूसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

1962 डायल करा

जिल्ह्यातील पशूधनावर तात्काळ उपचार करण्यासाठी पशूपालक यांनी 1962 या टोल फ्रीनंबरवर डायल करण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केलेले आहे. या ठिकाणी पशूवर उपचार करण्यासाठी फिरते चिकित्सालय उपलब्ध होणार आहे. यासाठी कंत्राटी पध्दतीने पशूधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक आणि वाहन चालक यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबत पशूधनावर शासकीय शुल्कातून फिरत्या पशूचिकित्सालयातून उपचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या