Friday, May 31, 2024
Homeनगरशहरातील उड्डाणपुलावर अपघात

शहरातील उड्डाणपुलावर अपघात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उड्डाणपुलावर (Ahmednagar Flyover) स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान काल (रविवारी) सकाळी सातच्या सुमारास पुन्हा एकदा दुचाकी वाहनाचा भीषण अपघात (Bike Accident) झाला. या अपघातात पतीचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू (Husband Death) झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी (Wife Injured) झाली आहे.

- Advertisement -

कार अपघातात तीन जण जखमी

किशोर जिजाबा गायकवाड (रा. तुरवली, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी चित्रा जखमी (Injured) झाली असून तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. नगरमधील उड्डाणपुलावरून (Ahmednagar Flyover) जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी कठाड्याला घसरून चालक पुलावरून खाली पडला. त्याचा मृत्यू (Death) झाला असून त्याची पत्नी जखमी झाली.

दुधभेसळी विरोधात आजपासून धडक मोहिम

दरम्यान, या अपघाताची (Accident) माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे (Bhingar Camp Police Station) सहा. पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे
ही सरकारची भूमिका – ना. विखेतोफखान्यांत जुगार अड्ड्यावर छापा

- Advertisment -

ताज्या बातम्या