अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील उड्डाणपुलावरून मालवाहतूक टेम्पो बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चांदणी चौकात कोसळला. या अपघातात टेम्पोतील एकाचा मृत्यू झाला.त्याची ओळख पटलेली नाही. एकजण जखमी झाले आहे. दादासाहेब कारभारी सपकाळ (रा. जांभळ, छत्रपती संभाजीनगर) असे त्यांचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगरवरून पी.व्ही.सी. पाईपच्या मालाची वाहतूक टेम्पो पुण्याच्या दिशेने जात होता. टेम्पो चालकाने नगर शहरातील हॉटेल अशोकाजवळ उड्डाणपुलावर आला. या उड्डाणपुलावर चांदणी चौकाजवळ धोकादायक वळण आहे. या उड्डाणपुलाच्या डाव्याबाजुच्या कठड्याला टेम्पो आदळला आणि खाली कोसळला. खाली लष्करी विभागाच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर टेम्पो पडला. या अपघातामध्ये भिंत पडली. एकजण टेम्पो बाहेर बाजुला फेकले गेले. या अपघातात टेम्पोतील एक जण जागीच मृत झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती शहरात समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली, भिंगार कॅम्प आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजुला घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, उड्डाणपुलावर या धोकादायक वळणावर यापूर्वी चार अपघात झालेले आहेत. वकिलांचा याठिकाणी पुलावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर आणखी दोन अपघात झाले आहेत. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. टेम्पो कोसळल्याने आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.