Friday, July 5, 2024
Homeनगरशेतकरी अपघात योजनेत 2 कोटींचा निधी मंजूर

शेतकरी अपघात योजनेत 2 कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 25.72 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता राज्य सरकारकडून फेबु्रवारी महिन्यांत देण्यात आली होती. या योजनेत नगर आणि जळगाव जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच जिल्हा कृषी कार्यालयाकडून लाभार्थी यांना योजनेत मंजूर निधीनूसार सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील शेतकर्‍यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 25.72 37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य सरकारकडून फेबु्रवारी महिन्यांत मान्यता देण्यात आली होती. आता योजनेत मंजूर अनुदानाचे पत्र आणि माहिती राज्यातील सर्व कृषी अधिक्षक कार्यालयास पाठवण्यात आलेले आहे. यात राज्यात सर्वाधिक निधी नगर आणि जळगाव

जिल्ह्यासाठी 2 कोटी

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्रात 2015- 2016 पासून कार्यान्वित होती. परंतु शासनाच्या या महत्वकांक्षी योजनेत अनेक त्रुटीसमोर आल्या होत्या. विमा कंपन्यांकडून दवे वेळेवर निकाली काढण्यात येत नव्हते. यामुळे या योजनेत पात्र शेतकर्‍यांचे देखील नुकसान होत होते. आता राज्य शासनाकडून 19 एप्रिल 2023 पासून ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य मिळू शकणार आहे. तसेच अंपगत्व येणार्‍या शेतकर्‍यांना 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहेत.

नगर जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी या योजनेसाठी आलेल्या प्रस्तावावर तालुकास्तरावर बैठक होवून त्याठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या शेतकर्‍यांची यादी जिल्हास्तरावर पाठवण्यात आली. जिल्हास्तरावर यादी अंतिम करून निधीसाठी राज्य सरकार मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानूसार नगर जिल्ह्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता तालुका पातळीवर दाखल प्रस्तावानूसार आलेल्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील कमीत कमी 100 ते जास्ती जास्त 200 पर्यंत शेतकर्‍यांना योजनेत लाभ होणार असल्याचा अंदाज आहे.

अपघात योजनेसाठी पात्र

शेतकर्‍याचा यापैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असल्यास योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश नक्षलाईकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल हे पात्र ठरणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या