Monday, May 27, 2024
Homeनगरनगरमध्ये 24 जुगारी पकडले

नगरमध्ये 24 जुगारी पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोठला भागातील हॉटेल कुरेशीच्या पाठीमागे सुरू असलेल्या तिरट जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि. 28) रात्री छापा टाकून 24 जुगार्‍यांना पकडले. त्यांच्याकडून रोकड, एक चारचाकी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा सात लाख 36 हजार 640 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

गफार शेख (रा. मुकुंदनगर), राजू शेख (प्रेमदान हाडको), संभाजी निस्ताने (रा. सर्जेपुरा), अ‍ॅगस्टीन गोनसालविस (रा. तारकपूर), इमाम पठाण (रा. केडगाव), बाळासाहेब खटके (रा. कायनेटीक चौक), किरण पानपाटील (रा. भिंगार), बाळासाहेब चेंडवाल (रा. गुंजाळे ता. राहुरी), किरण बहुगूणा (रा. कोठला), बालाजी बिजा (रा. सावेडी), अरबाज शेख (रा. कोठला), सुल्तान शेख (रा. कोठला), जिशान ू इनामदार (रा. मुकुंदनगर), निसार शेख (रा. शेवगाव), जाहिद सय्यद (रा.कोठला), राहुल आल्हाट (ता. नगर), छबुराव येळवंडे (रा. घोडेगाव), अनिल फुलारी, तबरेज इसाक शेख, रफिक गुलाब शेख (तिघे मुकुंदनगर), अख्तर शेख (रा. झेंडीगेट), इस्माईल पठाण (रा. बुर्‍हाणनगर), अर्शद शेख (रा. मुकुंदनगर), शुभम देवळालीकर (रा. कराचीवालानगर) अशी पकडलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजय ठोंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोंढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, रवींद्र घुंगासे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, मच्छिंद्र बर्डे, संभाजी कोतकर, अरूण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या