Monday, March 31, 2025
HomeनगरGram Panchayat Election 2023 Voting : पुणतांब्यात मतदान प्रक्रिया विस्कळीत, मतदारांच्या लांबच...

Gram Panchayat Election 2023 Voting : पुणतांब्यात मतदान प्रक्रिया विस्कळीत, मतदारांच्या लांबच लांब रांगा

पुणतांबा (वार्ताहर)  :पुणतांबा- रास्तापूर ग्रामपंचायती आज सरपंच व १७ सदस्याच्या निवडीसाठी आज सकाळपासून निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी सहा प्रभागासाठी ११ मतदान केंद्रे असून पुणतांबा गावातील अनेक मतकेंद्रासमोर लांबच लांबा रांगा लागलेल्या आहेत. दुपारी 3 पर्यंत काही केंद्रावर ४५ ते ५४ टक्के मतदान झाले. मात्र चांगदेवनगर येथील क्रमांक ६ मतदानकेंद्रावर १३५० मतदारासाठी अवधे एकच बुथ असल्यामुळे दुपारी २ वाजेपासून लांबच लांब रांगा लागल्या असून सध्या अंदाजे ३०० मतदार गेल्या दीड तासापासून रांगेत उभे तसेच काही खाली बसले आहे. त्यातच मतदानासाठी वापरण्यात येणारे Evm मशिन अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्यामुळे मतदानास विलंब होत असल्याचे मतदाराचे म्हणणे आहे. ही बाब मतदार व त्यांच्या प्रतिनिधी व उमेदवार यांनी तहसीलदार, निवडणूक अधिकारी व केंद्राध्यक्ष याच्या निर्दशनास आणून दिली असूनही प्रशासनाने काही ठोस कृती न केल्यामुळे मतदारामध्ये तीव्र संताप आहे. त्यातच वृद्ध महिला आजारी रुग्ण यांनाही त्रास करावा लागत असून मतदान असे सुरु राहिले तररात्री १२ वाजेपर्यत मतदान प्रक्रिया सुरु राहण्याची भिती निर्माण झाली आहे. मतदानावरून सध्या मतदार अधिकारी व पोलीस यंत्रणा याच्यात खडके उडत आहेत. राहुरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दुपारपर्यंत सरासरी २६.१४ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत.

- Advertisement -

राहाता : ग्रामपंचायत निवणूकसाठी सरासरी 24.40 टक्के!

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या व एका सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सरासरी 24.40 टक्के मतदान झाले. आज सकाळ पासूनच मतदानाला वेग नव्हता. अशाही स्थितीत काही ठिकाणी 35 टक्के इतके मतदान झाले. तालुक्यात सरासरी 24.40 टक्के मतदान झाले. दुपारी 4 नंतर मतदान टक्केवारी वाढू शकते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या