Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस

अहमदनगर | प्रतिनिधी

राज्यातील सत्ताबदलानंतर ग्रामीण भागात आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ज्वर चढल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमदेवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात भाऊगर्दी केली.

- Advertisement -

जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 8 हजार 376 उमदेवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सरपंचपदाच्या 203 जागांसाठी 1 हजार 282 तर सदस्यपदाच्या 1 हजार 922 जागांसाठी 7 हजार 94 अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी आल्याने राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा दिली, त्याचा मोठा परिणाम दिसून आला.

18 डिसेंबरला नगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. राज्यातील सत्तांतरानंतर होणारी ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यातील या 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबरपासून उमदेवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सुरूवातीचे तिन दिवस उमेदवारीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, ऑनलाईन अर्ज दाखल करतांना मोठ्या अडचणी येत असल्याने आणि त्याबाबत तक्रार झाल्यानंतर ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाच्यावतीने परवागी देण्यात आली.

उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात इच्छुकांनी गर्दी करत उमदेवारी अर्ज दाखल केले. यामुळे संपूर्ण जिल्ह्याची माहिती संकलीत करण्यास जिल्हा प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. 203 ग्रामपंचायतींसाठी 8 हजार 376 उमदेवारी अर्ज दाखल झाले असून सोमवारी (दि.5) दाखल अर्जाची छाननी होणार असून बुधवारी (दि.7) माघारीचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून ऐन थंडीत ग्रामीण भागात निवडणुकीचा ज्वर वाढला आहे.

तालुकानिहाय अर्ज

– अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य पदासाठी 192 तर सरपंच पदासाठी 48 अर्ज.

– संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या 367 सदस्य पदासाठी 1 हजार 25 तर सरपंच पदासाठी 251 अर्ज.

– कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या 248 सदस्य पदासाठी 878 तर सरपंच पदासाठी 159 अर्ज.

– श्रीरामपूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 54 सदस्य पदासाठी 162 तर सरपंच पदासाठी 39 अर्ज.

– राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या 132 सदस्य पदासाठी 425 तर सरपंच पदासाठी 71 अर्ज.

– राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 115 सदस्य पदासाठी 493 तर सरपंच पदासाठी 88 अर्ज.

– शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या 116 सदस्य पदासाठी 410 तर सरपंच पदासाठी 70 अर्ज.

– कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या 25 सदस्य पदासाठी 300 तर सरपंच पदासाठी 50 अर्ज.

– जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींच्या 27 सदस्य पदासाठी 132 तर सरपंच पदासाठी 26 अर्ज.

– श्रीगोंदा तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या 110 सदस्य पदासाठी 459 तर सरपंच पदासाठी 94 अर्ज.

– नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या 125 सदस्य पदासाठी 72 तर सरपंच पदासाठी 47 अर्ज.

– नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या 243 सदस्य पदासाठी 751 तर सरपंच पदासाठी 150 अर्ज.

– पारनेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या 160 सदस्य पदासाठी 638 तर सरपंच पदासाठी 103 अर्ज.

– पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या 109 सदस्य पदासाठी 414 तर सरपंच पदासाठी 64 अर्ज.

- Advertisment -

ताज्या बातम्या