Friday, October 2, 2026
HomeनगरAhilyanagar : महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

Ahilyanagar : महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

विद्यार्थ्यांचे आंदोलन || ऑक्सिजन व आवश्यक वैद्यकीय उपकरणे नसल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी परिसरातील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. महाविद्यालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी (20 ऑगस्ट) विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात धरणे आंदोलन केले असून, संबंधित प्रशासनावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

गायत्री अवताडे (रा. नेवासा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. गायत्रीच्या मृत्यूस महाविद्यालयातील अपुर्‍या वैद्यकीय सुविधांचा अभाव कारणीभूत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे. महाविद्यालयात ऑक्सिजनची पुरेशी सुविधा तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र, महाविद्यालयातील वैद्यकीय सुविधा अपुर्‍या असल्याने परिस्थिती गंभीर झाली, असा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थिनीच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार आहे, हे निश्चित करावे, अशी मागणी केली आहे. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करत परिसरात धरणे आंदोलन केले. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे महाविद्यालयात उपलब्ध होती. गायत्री अवताडे हिला वेळेत उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीमध्ये जिल्हा रूग्णालय व जिल्हा पोलीस प्रशासनातील अधिकारी सहभागी असतील. त्यांनी दिलेला निर्णय महाविद्यालय प्रशासनाला मान्य राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

स्फोटक

स्फोटक साठा प्रकरण: होलसेलरची एटीएसकडून चौकशी; एक्सपायर्ड अन् दुसऱ्याच्या नावावरील परवान्यावर...

0
नाशिक। प्रतिनिधीतालुक्यातील आंगणगाव येथे दहशतवादविरोधी पथकाच्य (एटीएस) नाशिक युनिटने छापा टाकून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान संशयिताकडे आढळलेला स्फोटकांचा परवाना...