Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar News : जिल्ह्यात १४ टक्क्यांनी पशुधन घटले; २१ व्या पशूगणनेत जिल्ह्यात...

Ahilyanagar News : जिल्ह्यात १४ टक्क्यांनी पशुधन घटले; २१ व्या पशूगणनेत जिल्ह्यात ‘इतके’ जनावरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नगरसह राज्यात २५ नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या २१ व्या पशुगणननेचा अहवाल येणे बाकी असले तरी यात प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील पशूधनात २० व्या पशूगणेच्या तुलनेत १४ टक्क्यांची घट आली आहे. २०१९ ला झालेल्या २० व्या पशूगणनेत जिल्ह्यात ३० लाख ७८ हजार ४३० विविध पशूधन होते. ते २०२५ च्या पशूगणेत २६ लाख ६८ हजार ६४० पर्यंत खाली आहे.

- Advertisement -

ग्रामीण जीवनाचा आधार असलेल्या शेती या मुख्य व्यवसायास पशुपालन, दुग्धव्यवसाय हे पुरक ठरतात. या पूरक व्यवसायातून उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत आणि वाढीव अन्नसुरक्षा मिळते. हे व्यवसाय भूमिहीन शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि महिलांसह वंचित घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात. यामुळे ग्रामीण आर्थिक व्यवसायांना चालना मिळते, तसेच दारिद्रय निर्मुलनात लक्षणीय योगदान मिळते. या उपक्रमांसाठी शासनाचे आर्थिक सहाय्य देखील मिळते. दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि डुक्करपालन अशा विविध माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळत आहे.

YouTube video player

दरम्यान, यंदाच्या २१ व्या पशूगणनेत पहिल्यांदा प्रथमच भटकी कुत्री, गाईंसह भटक्या पशुपालक समुदायाची माहिती गोळा करण्यात आली आहे. दरम्यान, २०१९ च्या २० व्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागात ३.३१ कोटी पशुधन होते. त्यावेळी महाराष्ट्र पशूधनाबाबत देशात सातव्या क्रमांकावर होता. यात नगरसह राज्यात पशुधन आकडेवारीच्या ४२.३ टक्के गाई व बैल, १६.९ टक्के म्हशी व रेडे, ८.१ टक्के टक्के मेंढ्या, शेळी शेळ ३२.१ तर ०.६ टक्के इतर (इतरमध्ये घोडे, शिंगरे, खेचरे, उंट व गाढवे समाविष्ट आहेत) पशुधन यांचा समावेश होता. यापूर्वी राज्यात पशुगणना २००३, २००७, २०१२ आणि २०१९ मध्ये घेण्यात आली. २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ अखेर या कालावधीत केली गेली, ही पशुगणना मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन पध्दतीने केली गेली.

पूशसंवर्धन विभागाच्या प्राथमिक माहितीनूसार नगर जिल्ह्यात २०२५ च्या जनगणनेनंतर २६ लाख ६८ हजार ६४० पशूधन असल्याचे समोर आले असून हे पंचवार्षिकच्या तुलनेत यात १४ टक्क्यांनी घट आलेली आहे. जिल्ह्यातील १ हजार ८७१ वाडी वस्त्यावर गावात ही पशूगणाना एकाचवेळी राबवण्यात आली. या पूशगणेत २०१९ असणारी गायींची संख्या ही देखील कमी झालेली दिसत आहे. यात त्यावेळी १३ लाख ४६ हजार ४३७गायी वर्ग प्राणी होते. यंदा त्यांची संख्याही १३ लाख २९ हजार ६५० झाली आहे. यासह गेल्या पंचवार्षिकला जिल्ह्यात २ लाख ९ हजार ७२७ म्हशींची संख्या होती ती देखील यंदउ कमी होवून १ लाख ७० हजारांवर आली आहे.

शेळ्यांची संख्या २५ टक्क्यांनी घटली

नगर जिल्ह्यात २०१९ ला झालेल्या पूशगणनेत ११ लाख ६० हजार शेळ्या व मेंढ्याची संख्या होती. ती यंदाच्या पूशगणनेच्या प्राथमिक माहितीत ८ लाख ४७ हजारांपर्यंत खाली आहे. म्हणजे जिल्ह्यात शेळी वर्गीय प्राण्यांच्या संख्येत जवळपास २५ टक्के घट आली आहे. नगरसह राज्यात पशूगणनेचे काम जवळपास पूर्ण झाले असून केंद्र सरकार जिल्ह्यातील पशूधनाच्या आकडेवारीची घोषणाल लवकरच करणार आहे.

ताज्या बातम्या