Monday, May 27, 2024
Homeनगरएमपीएससी.. 6598 उमेदवारांची दांडी

एमपीएससी.. 6598 उमेदवारांची दांडी

अहमदनगर (प्रतिनिधी)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 (Secondary Service Non-Gazetted Group B Joint Pre-Examination 2020) ही नगरच्या (Ahmednagar) केंद्रावर शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेला तब्बल 6 हजार 598 उमेदवारांनी दांडी मारली, तसेच परीक्षेला आलेल्या उमेदवारांपैकी एकही करोना बाधित (Corona) आढळला नसल्याची माहिती जिल्ह्याचे केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Deputy Collector Sandeep Nichit) यांनी दिली.

- Advertisement -

नगर शहरात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पुर्व परीक्षेसाठी 60 उपकेंद्र निश्चित करण्यात आले होते. परीक्षेसाठी शुक्रवारपासून जिल्हा प्रशासनाची (District Administration) लगबग सुरू होती. शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळत ही परीक्षा पार पडली. परीक्षेसाठी जिल्हाभरातून 19 हजार 147 उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. प्रत्यक्षात परीक्षेला 12 हजार 549 उमेदवार हजर होते. यावेळी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. परीक्षेला तब्बल 6 हजार 598 उमेदवारांनी दांडी मारली. परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पारपडली असून परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत एकही करोना बाधित आढळून आला नसल्याचे केंद्रप्रमुख निचित यांनी सांगितले.

परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली होती. यात 15 उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. यासह 3 उपजिल्हाधिकार्‍यांचे भरारी पथक होते. यासह उपकेंद्र प्रमुख म्हणून संवर्ग 1 च्या 60 अधिकार्‍यांची नियुक्त करण्यात आली होती. 187 पर्यवेक्षक, 79 सहायक, 798 समवेक्षक, 60 लिपीक, 60 शिपाई, 196 पाणी वाटप कर्मचारी, 78 वाहन चालक, 53 केअर टेकर आणि 53 बेलमन यांचा समावेश होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या