Saturday, May 4, 2024
Homeनगरआयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीला ‘ईस्मार्ट’कडून केराची टोपली

आयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीला ‘ईस्मार्ट’कडून केराची टोपली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात एलईडी पथदिवे बसविणे व देखभाल दुरूस्तीच्या कामाबाबत करारनाम्यामधील अटी शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी, तसेच दिलेल्या मुदतीत पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण न केल्याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीला ईस्मार्ट एनर्जी सोल्युशन कंपनीकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. नोटीसीत देण्यात आलेली मुदत संपल्यानंतरही कंपनीकडून खुलासा प्राप्त न झाल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे आता काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार

शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्यास दिरंगाई झाल्यास प्रतिदिन एक लाख रूपये दंड आकारण्याची तरतूद करारनाम्यात आहे. अद्यापर्यंत एलईडी बसविण्याचे काम निविदा अटी शर्तीनुसार पूर्ण केलेले नसल्याने व पथदिव्यांच्या वीज वापर देयकामध्ये 80 टक्के बचत निदर्शनास येत नसल्याने दंड का आकारण्यात येवू नये, अटी शर्तीचा भंग केल्याबाबत करारनाम्यानूसार कार्यवाही का करण्यात येऊ नये, असा सवाल करत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करावा, असे आदेश महापालिका प्रशासनाने ठेकेदार संस्था ईस्मार्ट एनर्जी सोल्युशन या संस्थेला दिले होते.

..तर 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा होतील बंद

जुन्या 35 हजार 105 फिटींग काढण्यात आल्या. त्याची 38 लाख 25 हजार 720 रूपयांची रक्कम ठेकेदाराने अदा करणे आवश्यक आहे. परंतु यातही करारनाम्यातील तरतुदींचे पालन झालेले नाही. देखभाल दुरूस्तीकरीता मनपाने जागा देऊनही स्वतंत्र कंट्रोल रूम सुरू करण्यात आलेली नाही. पथदिवे चालू-बंद करण्यासाठी टायमर स्वखर्चाने बसविणे आवश्यक असताना अद्यापही चालू-बंद करण्याचे कामकाज मनपाचे कर्मचारीच करत आहे. अधिक विविध मुद्द्यांवर आयुक्त डॉ. जावळे यांच्या आदेशानुसार कंपनीला नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

वीजेच्या शॉकने तरूण शेतकर्‍याचा दुर्देवी मृत्यू

कंपनीकडून अद्याप पर्यंत कोणताही खुलासा सादर झालेला नसल्याचे (बुधवारी) विद्युत विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आयुक्तांनी बजावलेल्या नोटिसीला कंपनीकडून केराची टोपली दाखविली गेल्याचे चित्र आहे. वारंवार सूचना देऊनही कंपनीकडून कामात सुधारणा होत नसल्याने महापालिका आयुक्त कंपनीवर कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या