अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
- Advertisement -
महाराष्ट्र शासनाने सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातल्यानंतर अहमदनगर महापालिका प्रशासनाने प्लास्टिक पिशव्या वापरणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. सोमवारी महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील पथकाने शहरात दुकानांमध्ये तपासणी केली.
विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत साडे चौदा किलो प्लास्टिकचा माल जप्त केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर शहरातील प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून शहरातील विविध दुकाने, आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्यास ते जप्त करण्यात येत आहे.